शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना आज सकाळी घडली. बारामतीमध्ये विमान अपघातात महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. दादांच्या अचानक अशा मृत्यूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला जबर धक्का बसला आहे.
बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बारामतीला प्रचार दौऱ्यासाठी जात असता, बारामती विमानतळावरच विमान लँडिंग होत असताना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 8:45 वाजता घडल्याचे समजत आहे. त्यांच्यासोबत आणखी 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर विमानाचा चक्का चूर झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विमानाचे लँडिंग अयशस्वी झाल्याने, विमान जोरात आदळून हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा