शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ मधील कन्या विद्या मंदिर शिरोळ नं. दोन या शाळेचे नामांतरण छत्रपती ताराराणी कन्या विद्यामंदिर शिरोळ असे शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर यांच्या आदेशाने करण्यात आलेले आहे. या शाळा नामकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शिरोळ तालुक्याचे आमदार मा. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघांचे सदस्य अमोल चव्हाण, शिरोळचे नगरसेवक अमर शिंदे, नगरसेविका श्वेता जाधव, नगरसेविका शिवानी कांबळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) दीपक कामत यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिरोळचे शाहरुख खलिफ यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व महेश पाटील यांनी शरीरसौष्ठव स्पर्धे मध्ये ज्युनियर महाराष्ट्र श्री 2026 हा मनाचा किताब पटकविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार यड्रावकर याप्रसंगी म्हणाले, शिरोळ हे ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. या गावाने एकदा ठरवले तर काहीही होऊ शकते. या शाळेत देखील छत्रपती ताराराणींसारख्या पराक्रमी विद्यार्थिनी घडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या शाळा नामांतरणासाठी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते, युवानेते अजिंक्य प्रतापसिंह माने पाटील यांनी विशेष प्रयत्न करून, वेळोवेळी जिल्हा परिषद कोल्हापूर, पंचायत समिती शिरोळ चा पाठपुरावा केला आहे. त्याबद्दल शिरोळ गावातून त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा