काळा ओढा बंद... आंदोलन अंकुश संघटनेला सर्वपक्षियांची साथ...बऱ्याच वर्षांपासून चालू असलेल्या पंचगंगा प्रदूषणाच्या आंदोलनाला मोठे यश...




गाम न्यूज नेटवर्क 



शिरोळ : आंदोलन अंकुश संघटनेने गेल्या महिन्याभरापासून पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर चालू केलेल्या लढ्याला आज मोठे यश आले. इचलकरंजीतील प्रोसेस कंपन्यांचे केमिकल युक्त उग्र वासाचे पाणी व इचलकरंजी महानगरपालिकेचे सांडपाणी ज्या काळ्या ओढ्याच्या मार्गे पंचगंगेत मिसळते, तो काळा ओढाच आज बंद करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदी इचलकरंजी मधील या प्रदूषित पाण्यापासून सुटकेचा निश्वास सोडेल असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.




इचलकरंजी प्रांत कार्यालयात प्रशासन आणि आंदोलकांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलकांनी काळ्या ओढ्यातील पाणी बंद करण्यासाठी 17 एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा प्रवाहित असलेल्या प्रत्येक गावात जाऊन जागृती करण्याचे काम या दहा दिवसात केले होते व आज 17 एप्रिल रोजी सर्व गावे बंद करून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केलेले होते. त्याप्रमाणे चुडमुंगे यांच्या आवाहनाला पाठिंबा देत, प्रदूषणाला त्रस्त झालेल्या सर्व नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला व काळा ओढाच बंद करून टाकला.




11 गावे कडकडीत बंद ; सर्वपक्षीयांचा आंदोलनाला पाठिंबा :

आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली चालेल्या पंचगंगा प्रदूषणाच्या या आंदोलनात या प्रदूषणाच्या पाण्यापासून त्रस्त असलेल्या, सर्वपक्षीय नागरिकांनी आपली गावे कडकडीत बंद ठेवून सहभाग घेतला.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने