लगाम न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड प्रतिनिधी : नंदकुमार सुतार सर
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येथील जिल्हा परिषद सरकारी दवाखाना, रोटरी क्लब व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना शहरातील १३ केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
२८ जून राष्ट्रीय पल्स पोलिओ दिनानिमित्त येथील शहरात जिल्हा परिषद सरकारी दवाखाना, रोटरी क्लब व नगरपालिकेच्यावतीने शहरातील ० ते ५ वयोगटातील बालकांना १३ केंद्रावर लसीकरण मोहीम सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
या मोहिमेत सरकारी दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, नर्सिंग कोर्सेसच्या विद्यार्थिनी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. शहरात २८०० बालक पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीचे लाभार्थी होते. तर बाहेर गावाहून शहरात आलेल्या बालकांनाही पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.
महाराष्ट्रात १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, येथील शहरात जिल्हा परिषद सरकारी दवाखाना, रोटरी क्लब व नगरपालिकेच्यावतीने आतापर्यंत ५९ वेळा पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा