आंदोलन अंकुश चा दणका... इचलकरंजीच्या प्रोसेस कंपन्या बंद..



शिरोळ :  पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ऑनलाईन पद्धतीने, तर तहसीलदार अनिलकुमार हेळकर, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी निखिल घरत, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी बाजीराव कांबळे, एमआयडीसीचे अधिकारी व आंदोलक मोठ्या प्रमाणात कार्यालयात उपस्थित होते. 




प्रशासनाने आंदोलकांसमोर हात टेकले : 

प्रोसेस चे नदीत येणारे प्रदूषित पाणी पहिला बंद करा, मगच पुढची चर्चा या मुद्द्यावर आंदोलक ठाम राहिले. खासदार, आमदारानीं देखील आंदोलकांना प्रतिसाद दिला आणि दांडगाव्याने प्रोसेस कंपन्या चालू केलेल्यांना त्या बंद करणे भाग पडले, तश्याप्रकारे लेखी प्रोसेस कंपनी मालकांनी लिहून दिले. मगच आंदोलकांनी अधिकाऱ्यांची सुटका केली. तब्बल 5 तास आंदोलकांनी अधिकाऱ्यांना सोडले नाही. धनाजी चुडमुंगे यांनी अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.


दम असेल तर प्रोसेस कंपन्या बंद करून दाखवा, म्हणून अंगावर येणाऱ्या प्रोसेस मालकांना धनाजी चुडमुंगेंनी 8 दिवसात दम दाखवला


8 दिवसांपूर्वी इचलकरंजी मधील काही प्रोसेस मालक "दम असेल तर प्रोसेस बंद करून दाखवा" म्हणत, धनाजी चुडमुंगे यांच्या अंगावर आले. आज अब्जावधिंची संपत्ती असणाऱ्या या प्रोसेस मालकांना आपला दम दाखवत, धनाजी चुडमुंगे यांनी प्रोसेस कंपन्या बंद करून दाखवल्या आणि भल्या भल्यांना जे जमलं नाही ते करून दाखवलं. 





एवढ्यावर न थांबता प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना,  प्रोसेस वाल्यांना "कंपनी चालू करायची नाही, चालू केल्यास कायस्वरूपी बंद करण्यात येईल. असा अहवाल पाठवण्यात येईल." अशी नोटीस काढायला लावली व ती नोटीस लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सोबत स्वतः इचलकरंजी ला गेले आणि कंपन्या खरोखर बंद आहेत का..? व नोटीसा लागू झाल्या याची खात्री करून आले. 




यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, आज प्रोसेस बंद केल्या आहेत. उद्या काळा ओढा पूर्ण बंद करतो म्हंटल्यावरच 3 तारखेचे आंदोलन स्थगित केले आहे. एक थेंब प्रदूषित पाणी पंचगंगेत घेणार नाही, हा निर्धार आजही कायम ठेवला. इचलकरंजीत जाऊन प्रोसेस कंपन्यांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला प्रदूषण मंडळाने आज आमच्या समवेत सील ठोकले. दांडगावा करून पुन्हा प्रोसेस सुरु केल्यास कायमस्वरूपी बंद केल्या जातील असं प्रदूषण मंडळाने प्रोसेस वाल्याना लेखी बजावले. आंदोलनास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मन्नपूर्वक आभार. पंचगंगा प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने