दत्तवाड प्रतिनिधी : अचिन हेरवाडे
दत्तवाड येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेच्या वतीने आज आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी दिंडीसाठी शाळेत उपस्थित झाले होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी "संत गोरा कुंभार" या विषयावरील नाटिका सादर केली. गांधी चौक, दसरा चौक, कुंभार वेस आणि गणपती मंदिर चौक येथे या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटिकेचा आनंद घेतला.
दिंडीत लहान मुले विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांच्या हातात तुळस, वीणा तसेच टाळ-मृदुंग घेऊन गावातील प्रमुख मार्गांवरून भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. संपूर्ण गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले.
या दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये खोत सर, पाटील सर, मगदूम सर तसेच सौ. दानवाडे मॅडम, सौ. पाटील मॅडम, सौ. कंदले मॅडम, काने मॅडम, खोत मॅडम, आकिवाटे मॅडम, कोरवी मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
भक्ती, संस्कार आणि संतपरंपरेचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा