सैनिकांचे सलग दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच... प्रस्तावित सैनिक टाकळी एम.आय.डी.सी. रद्दचा लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार




लगाम न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर : काल सोमवार दिनांक 27 जुलै पासून सैनिक टाकळीच्या माजी सैनिक व शेतकऱ्यांनी आमच्या गावाची परंपरा, शेती- माती, हवा- पाणी जपण्यासाठी प्रस्तावित एम.आय.डी.सी. हटवा म्हणून अमरण उपोषण चालू केला आहे. यामध्ये तीन माजी सैनिक आणि तीन शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत महसूल आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ एम.आय.डी.सी.ची प्रक्रिया थांबवून रद्दचे पत्र देत नाहीत.  तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असं आंदोलकांनी सांगितलं. 





आंदोलन स्थळी वेगवेगळ्या सामाजिक संघटना पक्ष यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवणे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव मुळीक नाना, लिंगायत समाजाच्या सरलाताई पाटील, गोकुळचे प्रकाश पाटील, दलित महासंघाचे दिगंबर सकट, ब्लॅक पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कोइगडे यांनी पाठिंबा दिला. सायंकाळी चार वाजता आंदोलन स्थळी शेतकरी  कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पवार पाटील यांनी भेट दिली आणि पाठिंबा दिला. तसेच थेट पालकमंत्र्याना फोन लावला व आंदोलन स्थळी भेट करून, आंदोलकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घ्या अशी सूचना केली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींगला आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशजी आबिटकर साहेबांनी आंदोलकांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली 


आंदोलकांनी सैनिक टाकळी गावाला अपेक्षित  विकासासाठी जमीन आरक्षित ठेवावी व एम.आय.डी.सी. रद्द करा.  अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आबिटकर यांचेकडे केली. शिरोळ तालुक्यामध्ये अजून इतर ठिकाणी जमिनी शिल्लक आहेत, त्या ठिकाणी एम.आय.डी.सी. करा. पण सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेला अपेक्षित नसलेली एम.आय.डी.सी. रद्द करा अशी मागणी केली. 


पालकमंत्र्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेऊन मी जिल्हाधिकारी साहेब तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांशी बोलून मार्ग काढतो असं आश्वासन दिले. आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी जोपर्यंत एम.आय.डी.सी. रद्द चे लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार. यापुढे आंदोलनात पंचक्रोशीतील महिला पूरग्रस्त नागरिक सामील होणार असा इशारा दिला आहे.


यावेळी विनोद पाटील, अमर पाटील, रि. कॅप्टन प्रकाश खोत, रि. वॉरंट ऑफिसर अमर पाटील, रिटायर हवलदार राजेश कदम, रि. विजय गायकवाड, शामराव पाटील, अमर वसमकर, प्रदीप पाटील, नवनाथ पाटील, दिलीप पाटील, हनुमंत पाटील, गोपाल चव्हाण, रोहन पाटील, सुहास पाटील, सुनील कानिटकर, यांच्यासह माजी सैनिक संघटना, आंदोलन अंकुश संघटना, टाकळी जलजमीन जीवन बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने