श्री.दत्त साखर शिरोळमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न... येत्या हंगामात 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : गणपतराव पाटील




लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : येथील श्री दत्त साखर कारखान्यात आगामी गळीत हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मिल रोलर पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी 14 लाख  टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 


कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच  कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी सर्व यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती वेगाने सुरू आहे. ऊस वाहतूक, तोडणी आणि गाळप प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची, तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक तसेच कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अॅड.प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदिप बनगे, बाळासाहेब पाटील-हालसवडे,रावसाहेब नाईक, मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर एस.ए. चौगुले, प्रोडक्शन मॅनेजर एम.एस. जाधव यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने