लगाम न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाड परीक्षेत छत्रपती शाहू विद्यालयाचा विद्यार्थी श्रीतेज प्रमोद सुतार याने सुवर्णपदकासह शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड व इंडियन टॅलेंट ग्रुप यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाड राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत छत्रपती शाहू विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रीतेज प्रमोद सुतार याने सुवर्णपदक पटकाविले. त्याला इंडियन टॅलेंट ग्रुपची स्कॉलरशिप देखील मिळाली आहे.
त्याला विद्यालयाचे कलाशिक्षक पुरुषोत्तम सरनाईक, प्राचार्या दिपाली उपाध्ये यांचे मार्गदर्शन तर आई कला शिक्षिका स्वाती सुतार, वडील प्रमोद सुतार यांचे प्रोत्साहन मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा