लगाम न्यूज नेटवर्क
सैनिक टाकळी : येथील गावचा सैनिकी इतिहास पाहता गावातील 18 शहीद जवानांनी देशासाठी आपले सर्वोच्च प्राणाचे बलिदान दिलेले आहे. अशा गावचा अभिमान शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला असून, या गावामध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसो यांच्या मागणीनुसार एम.आय.डी.सी. लादली जात असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी उपोषण सुरु केलेलं आहे.
यापूर्वी या गावाने सैनिकी परंपरेला अनुसरून त्या गायरान जमिनीवरती सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय,भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी क्रीडांगण, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी यासारख्या मागण्या केलेल्या आहेत. या सर्व मागण्या डावलून त्या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यड्रावकर यांच्याकडून एम.आय.डी.सी. लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा गावचे नागरिक आरोप करत आहेत. शहीद जवानांच्या भूमीमध्ये एम.आय.डी.सी. लादुन इथली संस्कृती, मराठा समाजाची अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्यामुळे टाकळी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी त्या विरोधात आज गुरुवार दिनांक 9 जुलै पासून अमर जवान हुतात्मा स्मारक, टाकळी या ठिकाणी उपोषण सुरू केलेले आहे. यामध्ये दीपक पाटील, विनोद पाटील, अमर वासमकर, प्रदीप पाटील यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
आज दिवसभरात प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेले दिसत असून, दिवसभरात यापैकी कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शनिवारी 11 जुलै रोजी सकाळी 12 वाजता कुरुंदवाड- चिक्कोडी रोड दसरा चौक, टाकळी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी संभाजी पाटील,सिद्धू पाटील, राजेश कदम, आत्माराम पाटील, धनाजी पाटील, दत्ता दुरगुडे, हनुमत पाटील, अमर पाटील, सुनील कोष्टी,शिवाजी बाबर, नवनाथ पाटील यांच्यासह टाकळी पंचक्रोशीतील आजी माजी सैनिकांसह शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा