एम.आय.डी.सी. नको म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या सैनिक टाकळीच्या आंदोलकांवर कुरूंदवाड पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून टाकला 'दंगलीचा' गुन्हा..? माजी सैनिक आणि महिलांच्यावरही घातले गुन्हे...



लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : ज्या गावातील 18 जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिल.. ज्या गावाने आजपर्यंत 1500 च्या जवळपास सैनिक आपल्या देशाला दिले.. ज्या गावातील प्रत्येक घरात देशसेवा केलेला आणि करत असलेला सैनिक राहत आहे., त्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावाने आम्हाला  एम.आय.डी.सी. नको, आम्हाला सैनिक स्कूल द्या.. आम्हाला केंद्रीय शाळा द्या.. माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी द्या.. आम्हाला देश सेवेत भरती होण्यासाठी क्रीडांगण द्या..अशी मागणी करून त्यांच्या गावावर शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून लादण्यात आलेल्या  एम.आय.डी.सी. ला विरोध केला आहे. 


 एम.आय.डी.सी. ला विरोध म्हणून, पहिल्या टप्प्यात प्रमुख 5 लोकांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले होते. आमरण उपोपषणास बसून देखील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, म्हणून ग्रामस्थांकडून 11 जुलै रोजी प्रशासनाला रीतसर निवेदन देवून प्रतीकात्मक रास्तारोको करण्यात आला. रास्तारोको मध्ये गावातील माजी सैनिक व महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रास्ता रोको मध्ये भारत देशाचा तिरंगा फडकत होता. 





या रास्ता रोकोची देखील प्रशासनाकडून लवकर दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे हे रास्ता रोको थोडा जास्त वेळ लांबले.  वयस्कर नागरिक, महिला, माजी सैनिक, ग्रामस्थ असे सर्वजण अधिकारी येतील आणि  आमच्यावर लादण्यात आलेली  एम.आय.डी.सी. रद्द होईल अशी वाट बघत उन्हा तान्हात बसले, परंतु कोणीही कायदा हातात घेतला नाही. नाममात्र रास्ता रोको सुरू असला तरी गाड्या जाण्यासाठी ईतर रस्ते सुरूच होते. पोलिस गाडी जण्यासाठी मार्ग करून देत होते. त्यांना कोणीही विरोध केला नाही. 





कुरूंदवाड पोलिस उपोषण सुटल्यानंतर आंदोलकांचा गोड कळ्याचा लाडू खावून हसत हसत  पोलिस स्टेशनला गेले. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर अचानक फोनाफोनी झाली आणि पोलिसांनी सैनिक टाकळीच्या निवृत्त सैनिकांसह, महिला व पत्रकारांवर देखील गंभीर गुन्हे घातले. निवृत्त सैनिक, महिला, पत्रकार यासंह 33 जणांवर गुन्हे घालण्यात आले. ही बातमी सैनिक टाकळीत पसरताच नागरिक, सैनिक, महिलांना धक्काच बसला. आमच्या बरोबर गोड गोड बोलून, जाताना आमचाच गोड  लाडू खाऊपर्यंत कोणताही गुन्हा घडलाय,अस न वाटलेल्या कुरूंदवाड पोलिसांना अचानक पोलिस स्टेशनला गेल्यावर काय झाल ..? नेमका कोणाचा फोन आल्यावर हे गुन्हे घालण्यात आले ..? याची चर्चा जोरदार सुरू आहे. 


माजी सैनिक, महिला, आंदोलनाचे शूटिंग करणारे पत्रकार यांच्यावर गुन्हे घालणारे कुरूंदवाड पोलिस अत्यंत कार्यातत्पर आहेत यात शंकाच नाही. परंतू जे अधिकार कुरूंदवाड पोलिस देश सेवा करणाऱ्या सैनिकावर आणि  महिलांवर वापरत आहेत, तेच अधिकार राजरोसपणे अवैध धंदे करणाऱ्यांवर का वापरत नसतील ..? पैसे घेवून अवैध धंदे कुरूंदवाड परिसरात चालू असतील का ..?  असा सवाल सैनिक टाकळीच्या नागरिकांवर घातलेले गुन्हे बघून धक्का बसलेले सुजाण नागरिक करत आहेत.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने