पावसाचा जोर वाढला ; नृसिंहवाडी दत्त मंदिरात या मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न

          नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील दत्त मंदिरात दक्षिणद्वार झाल्याने भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला


कुरुंदवाड प्रतिनिधी : नंदकूमार सुतार सर 


कोयना, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील दत्त मंदिरात आज पहटेच्या सुमारास या मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. 


गेल्या २४ तासात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने येथील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्रींच्या मुख्य चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडले. या दक्षिणद्वार सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावून पवित्र स्नानाचा लाभ घेतला. 


दक्षिणद्वार झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरल्याने कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, मिरज, जयसिंगपूर, सांगली आदी परिसरासह सीमा भागातील शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला. दत्त देव संस्थांमार्फत येणाऱ्या भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी ब्रॅकेटची व्यवस्था केल्याने भाविकांना सुलभपणे स्नान करता आले. गुरुवारी रात्री पाण्याची पातळी वाढत गेल्याने पहाटे दक्षिणद्वार झाले. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने