लगाम न्यूज नेटवर्क :
शिरोळ : प्रस्तावित एमआयडीसी विरोधात 2023 पासून टाकळी पंचक्रोशी मधून विरोध होत असताना झालेल्या क्रांती दिना दिवशी झालेल्या मोर्चामध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी सैनिक व शेतकऱ्यांना बैठकीला बोलवून मारहाण करण्यात आली. तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान देखील केला गेला. त्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट रोजी शिरोळ तहसील कार्यालय आमदारांच्या हस्ते ध्वजवंदन होऊन देणार नाही. तसेच प्रस्तावित एमआयडीसी विरोधात उद्योग मंत्रालयाच्या स्तरावर बैठकीचे पत्र मिळावे. अन्यथा 15 ऑगस्ट दिवशी दुपारी बारा वाजता आमदारांच्या कार्यालयावर शिरोळ तालुक्यासह, कोल्हापूर जिल्ह्यातील समविचारी सर्व पक्ष, संघटना, नागरिक, माजी सैनिक व शेतकऱ्यानंसह भव्य मोर्चा काढुन आ. यड्रावकर यांना MIDC चा एवढा अट्टाहास कश्यासाठी..? याचा जाब विचारणार असल्याचे दीपक पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजीराव माने, सकल मराठा समाजाचे चंद्रकांत जाधव बापू, कुलकर्णी काका, धनंजय महाडिक युवाशक्ती जयसिंगपूरचे ज्योतीराम जाधव, उत्तम पाटील, दलित संघटनेचे अरविंद धरणगुत्तीकर, दलित महासंघाचे आयुब पट्टेकरी, स्वराज्य क्रांती संघटनेचे आदम मुजावर, श्रीकांत शिंगाई, राजू गाडीवडर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, मधुकर पाटील, निलेश तवंदकर, जीवन किणेकर, रतन वाजे, मंगेश पाटील, पांडूसिंग राजपूत, जयपाल कोळी, सागर माने, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, गुलाब शेख, नंदकुमार कदम, अण्णासाहेब कांबळे, सुंदर कांबळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील कित्येक नागरिक उपस्थित होते.
सैनिक टाकळी येथील प्रस्तावित MIDC रद्द करा. या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा