लगाम न्यूज नेटवर्क
टाकळी : येथील गावच्या हद्दीतील गायरान जमिनीवर होणारी प्रस्तावित एमआयडीसी होऊ नये यासाठी टाकळी गावातून काल गुरुवार दिनांक 02 जुलै रोजी सायंकाळी निषेध फेरी काढत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील आजी - माजी सैनिक,शेतकरी,नागरिक मोठ्या संख्येने निषेधफेरीमध्ये सामील झाले होते. प्रथम अमर जवान हुतात्मा स्मारकास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध फेरीची सुरुवात करण्यात आली.
एम.आय.डी.सी. हटवा ! गाव वाचवा !
जय जवान ! जय किसान !
जमीन वाचवा ! पाणी वाचवा ! अशा घोषणा देत नियोजित इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेला सुद्धा विरोध करण्यात आला. घोषणांनी आसमंत दणाणून सोडत गावातील मारुती मंदिर परिसरामध्ये निषेध फेरीचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेचे स्वागत व प्रस्ताविक विनोद पाटील यांनी केले तर, आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,माजी सैनिक संघटनेचे संभाजी पाटील, शामराव पाटील, प्रकाश खोत, अण्णासाहेब पाटील,शामराव बापू पोस्ट मास्तर इत्यादींनी सभेला मार्गदर्शन करत मनोगते व्यक्त केली.
सैनिक टाकळीची सैनिकी परंपरा नष्ट करून पाहणाऱ्या एम.आय.डी.सी. लादणाऱ्या शासनाचा निषेध करत, लोकप्रतिनिधींच्या भुमिकेचा खरपूस समाचार घेण्यात आला. यापूर्वी गावाने कित्येक वर्षापासून गावाने सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय विद्यालय या मागण्या केलेल्या आहेत. त्या मान्य कराव्यात आणि प्रस्तावित एम.आय.डी.सी. रद्द करावी. तसेच त्या भागावर अन्यायकारक पद्धतीने लादलेली राधाकृष्ण पाणी योजना रद्द करावी. या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या गुरुवारी ९ जुलैपासून टाकळी येथील अंमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा यावेळी सार्वमताने देण्यात आला.
तशा आशयाचे निवेदन मा.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच तहसीलदारसो शिरोळ, पोलीस निरीक्षकसो कुरुंदवाड यांना देण्यात आलेले आहे. यावेळी सभेला अमर पाटील, राजेश कदम ,किरण पाटील, चंद्रकांत भोसले, आत्माराम पाटील, रामचंद्र पाटील ,सुधाकर गायकवाड हनुमंत पाटील श्रीधर भोसले प्रदीप पाटील ,अमर वासनकर धनाजी पाटील ,संतोष गायकवाड ,राजू पाटील शिवाजी बाबर ,सौरभ पाटील ,संतोष मिरजे सुरेश पाटील,गोटू पाटील ,दगडू कांबळे, बंडू पाटील ,संजय पाटील, सिद्धू गायकवाड व बी.डी. पाटील इत्यादी शेतकरी आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा